माहेरी वरून नांदावयास आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण; गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप
शेगाव । माहेरी नांदावयास आलेल्या पत्नीला पतीने मारहाण केल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी ईदगाह प्लॉट येथे घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फिर्यादी शबाना परवीन मो. सादीक रा. सोनटक्के प्लॉट अकोला यांनी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादीच्या बहिणीची मुलगी सायरा हिचे लग्न सै.अली सै. अनिस रा. शेगाव याच्यासोबत झाले होते. सायरा व तिचा पती यांचे घरगुती वाद असल्यामुळे दोन महिन्यांपासून सायरा ही तिच्या माहेरी अकोला येथे राहत होती. त्यानंतर ज्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची बहिण व फिर्यादीच्या बहिणीची मुलगी ही सायरा हिला सासरी नांदायला सोडण्यासाठी ईदगाह प्लॉट येथे आलो असता आरोपी सै.अली सै.अनिस म्हणाला की तुम्ही कसे काय आले. घरातून
निघा असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी सायरा हीने माझे घर आहे मला नांदायचे आहे असे म्हटले असता परवीन मो. युसूफ हीचे डोक्यात मारून जखमी केले. तसेच शे. येतशाम शे. अक्रम हैदर, शे अकमल शे. अक्रम हैदर यांनी सुध्दा त्यांच्या हातातील लोखंडी पाईपाने तिघींना डोक्यावर पाठीवर मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी सैय्यद अली सै. अनीस, शे. अक्रम आसीफ हैदर, तसेच शे. येतशाम शे. अक्रम हैदर व शे. अकमल शे. अक्रम सर्व रा. ईदगाह प्लॉट शेगाव यांचे विरूध्द कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) भान्यासंनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बरिंगे हे करीत आहेत.



