हिवरखेड येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी

हिवरखेड प्रतिनिधी:-
महाराजा श्री अग्रसेनजी जयंती हिवरखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
अकोट-जळगाव राज्य मार्गावरील हिवरखेड येथे संकट मोचन मंदिर समोर श्री अग्रसेन भवन च्या प्रस्तावित नवीन जागेत महाराजा श्री.अग्रसेन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला मंडळींचे आणि लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले. तद्नंतर भजन कीर्तन आणि संध्याकाळी महाराजा श्री अग्रसेनजी यांचे पूजन, हारार्पण, नंतर महाआरती आणि तीर्थप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या जीवन कार्यावर यावेळी जेष्ठ मार्गदर्शकांनी प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला डॉ. मुरलीधर अग्रवाल, संतोष महादेवरायजी बजाज, रामधन अग्रवाल, गणेश अग्रवाल, अविनाश अग्रवाल, राजेश जयनारायनजी अग्रवाल, राजेश मोहनलालजी अग्रवाल, प्रदीप बजाज, जितेंद्र माधानी, (पंकज) मुकुंद अग्रवाल, अतिश बजाज, धिरज बजाज, नयन अग्रवाल, विवेक अग्रवाल, वसंत सिंघानिया, पावन बजाज, अक्षत बजाज, वेदांत बजाज, इत्यादी उपस्थित होते. यावेळी अग्रवाल महिला मंडळ व नवयुवती मंच च्या सर्व प्रतिनिधीनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अग्रसेन भवन समिती हिवरखेड च्या कार्यकर्त्यांनी आणि देविदास शितोडे, अरुण माळी, आचारी नांदोकार, इत्यादीनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन
महाराजा श्री अग्रसेनजी जयंती कार्यक्रमात उपस्थित अग्रवाल समाज बांधव



