जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

खडसे महाविद्यालयात कला व ललित कला एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

  मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात कला मंडळ व विद्यार्थी विकास विभाग यांच्या अंतर्गत  16 सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून या कार्यशाळेत सहभाग नोंदवला . या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. उदय अडायके हे लाभले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध कला प्रकार व महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला परंपरेचा परिचय देऊन भारतीय प्रथा, परंपरा याचे अनेक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन योग्य दिशेने वाटचाल करावी व कला क्षेत्रामध्येही आज घडीला खूप मोठे रोजगार उपलब्ध आहेत याची अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे हे लाभले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्राविषयी रुची उत्पन्न करावी व कलेनेच व्यक्तित्व बहरते त्यासाठी सदैव समोर यावे व लपलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन विविध क्षेत्रांमध्ये काम करावे असे आवर्जून सांगितले.

  या कार्यशाळेमध्ये तबलावादन, हार्मोनियम वादन,रांगोळी स्पर्धा,  स्पर्धा, गीत गायन अशा अनेक कलाकृती सादर करण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच . ए.महाजन व उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. 
 या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार डांगे प्रस्ताविक डॉ. अतुल बडे तर आभार डॉ. डॉ.दत्तात्रय कोळी यांनी व्यक्त केले.
   या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. गणेश शालिग्राम चव्हाण, डॉ. कृष्णा गायकवाड प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व  महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button