खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगरात ‘मुक्ताईचा राजा गणेश मित्र मंडळा’चा अष्टविनायकांचा देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – नगरपंचायत ग्राउंडवर दरवर्षी नवनवीन व अनोख्या संकल्पना सादर करणारे मुक्ताईचा राजा गणेश मित्र मंडळ यावर्षीही भक्तांच्या मनाला भावेल असा उपक्रम घेऊन आले. मंडळाने भाविकांसाठी अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडवून आणले.

मंडपात प्रवेश करताच भाविकांना अष्टविनायकांच्या प्रतिकृतींचे दर्शन घेता आले. मयुरेश्वर ,सिद्धिविनायक , बल्लाळेश्वर वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मज , विघ्नेश्वर आणि महागणपती या आठही गणपतींच्या प्रतिकृतींनी मंडपात आगळेवेगळे धार्मिक वातावरण निर्माण केले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या देखाव्याचे कौतुक केले.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक पोशाखात आणि सांस्कृतिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दरवर्षी वेगळ्या संकल्पना आणून समाजात धार्मिक तसेच सांस्कृतिक मूल्य जागविण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी अष्टविनायकांचा देखावा साकारण्यात यश आले, यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे.”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button