महाराष्ट्र

मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधातील तक्रारीची ‌ प्रशासनाकडून दखल घेण्यास टाळाटाळ,

तेल्हारा नगरपरिषद कार्यालय समोर ,नरेंद्र सुईवाल यांचे आजपासून आमरण उपोषण…

वारंवार निवेदन देऊनही दखल नाही..

संतोष गिऱ्हे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी माळेगाव बाजार

तेल्हारा: आमरण उपोषण करिता बसणारे नरेंद्र गोकुलचंद सुईवाल अर्जदार व इतर व्यवसायिक यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे 1 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या रिपोर्टमध्ये व तसेच 21 फेब्रुवारी 2025 दुकान साहित्याचे सरकारी वाहनामध्ये असलेले जीपीएस द्वारे फोटो पुरावे म्हणून सादर केले आहेत. व स्मरणपत्र 29 जून 2025 रोजी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे देऊन तसेच 4 ऑगस्ट 2025 रोजी स्मरणपत्र जिल्हा अधिकारी यांना दिले असून इतकेच नव्हे तर मुख्य अधिकारी नगर परिषद तेल्हारा या पदावर असलेले सतीश गावंडे हे मनमानी कारभार करीत असून त्याबाबत दिनांक 18 जुलाई 2025 रजी, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही…मात्र सदर अर्जावर कुठलीही कारवाही न झाल्यामुळे तेल्हारा नगर परिषद कार्यालया समोर उपोषणाला बसल्या असल्याबाबतचे ‌दि 4 ऑगस्ट 2025 ला स्मरण पत्र दिले. अद्यापही कारवाई न झाल्याने मला आमरण उपोषण बसावे लागत आहे.. तेल्हारा नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याकरिता परवानगी देण्यात यावी तसेच आमच्या तक्रारीचे निवारण न झाल्यास व आमरण उपोषण बसल्याने माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी आणि परवानगी देऊन पोलीस संरक्षण पुरवण्याची व्यवस्था करावी ..आणि 18 जुलाई 2025 च्या अर्जावर स्मरण पत्रावर योग्य ती कार्यवाही जिल्हाधिकारी अकोला यांनी करावी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात दिलेल्या अर्जावर व स्मरण पत्रावर योग्य ती कार्यवाही व्हावी ही विनंती अन्यथा मला उपोषणास बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे उपोषण करतांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अकोला दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी लेखी स्वरूपात दिले असून तसेच तेल्हारा शहर वाशी नागरिकांच्या इतर समस्यावर योग्य ते वेळेस कारवाई न झाल्याने अर्जदार हे वेगवेगळ्या मुद्द्याच्या समस्या घेऊन एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने नगरपरिषद चे मुख्य अधिकारी सतीश गावंडे यांच्या मनमानी व हुकूमशाही असलेल्या कारभार बाबत व तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ही स्थानिक स्वराज्य शासकीय संस्था शासनाच्या योजना चे लाभ नागरिकापर्यंत नगरपरिषद मार्फत पोहोचविले जातात पण या सर्व योजना कागदोपत्री नाचवले जातात मात्र नागरिक सुविधा पासून वंचित राहतात त्यामुळे मुख्य अधिकारी यांचे हेकेखोरपणामुळे मनमानी सुरू असल्याने तेल्हारा नगरवाशी ह्या सर्व योजनेपासून वंचित असल्याचे आरोप नागरिकाकडून होत असल्याचे जमके चर्चेत सुरू आहे तसेच जिल्हाधिकारी यांनी आमरण उपोषण बसण्याआधी योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या समस्या निकाली काढल्यास उपोषण करता उपोषणाची बाजू मागे घेतले जाईल. असे या निवेदनात दिले होते . परंतु नगरपरिषद कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नरेंद्र सुईवाल यांनी ८/९/२०२५ पासून आमरण उपोषण करणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button