Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

धक्कादायक : रोप-वेची केबल तुटल्याने सहा जणांचा मृत्यू :  पावागड टेकडीवर घडली घटना !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

कार्यकारी संपादक

रंजन पवार

जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५

देशातील गुजरात राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागड टेकडीवर शनिवारी एका मालवाहू रोप-वेची केबल तुटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. या मालवाहू रोप-वेची केबल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तुटल्याने मोठा अपघात घडला.

या रोप-वेमधून मालवाहतूक होत होती. परंतु, या घटनेच्या वेळी त्यात सहा प्रवासी होते. रोप वे तुटल्यानंतर ते सर्वजण खाली कोसळले. या घटनेत दोन लिफ्ट ऑपरेटर, दोन मजूर आणि अन्य दोघांचा समावेश आहे. ज्या ठिकाणावरून रोप-वे खाली कोसळला, त्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पंचमहालचे जिल्हाधिकारी अजय दहिया यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पावागड येथील महाकालिका मंदिरासाठी ही टेकडी प्रसिद्ध आहे. मंदिर टेकडीच्या माथ्यावर असून, तेथे जाण्यासाठी दोन हजार पायर्‍या चढून जावे लागते किंवा मुख्य रोप-वेचा वापर केला जातो; पण गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामानामुळे मुख्य रोप-वे सेवा बंद होती. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button