सरसकट कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे आंदोलन…

सरसकट कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे आंदोलन…
मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल अक्षय पाटील.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दिनांक 28 जुलै रोजी एकत्रित येत युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करून आपल्या भावना शासन दरबारी मांडल्या खरंतर या महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळे दर दिवसाला 8 ते 9 शेतकरी कर्जबाजारी पनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे असे भयानक वास्तव्य असूनही सरकार कर्जमाफी का? करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. असे असताना सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा दुसरीकडे 2023 -24 चा उर्वरित पिक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मात्र अजूनही हजारो शेतकरी पिक विमा मिळण्यापासून वंचित असून त्या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करा मागील वर्षी 2024 संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके उध्वस्त झाल्याने शासनाने मदत सुद्धा जाहीर केली मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. तरी ही मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यातवर जमा करा तसेच यावर्षी हुमणी अळीने हजारो हेक्टर जमिनीवरचे उभे पीक उध्वस्त केल्याने शेतकरी मात्र अजूनही संकटात सापडला आहे. ही बाब शासनाने लक्षात घेऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी तसे इतर विविध मागण्या घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तहसीलदार पवन पाटील साहेब जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील शिवदास खेडकर, अनिल सिंह राजपूत, सदाशिव गवई, समाधान गवई, भाऊजी पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, सोपान पाटील, सदाशिव जाणे, पप्पू पोटे, मोहन चांभारे, त्रिलोक सिंह राजपूत, फारुख शेख, संतोष गणगे, विठ्ठल खंडेराव, अनंता मारोडे, संदीप वाघ, रवींद्र निर्मळ, गौतम तायडे, आदर्श निंबाळकर, सतीश निंबाळकर, सागर गवळी, गजानन ढगे, रिजवान काझी, श्रीकृष्ण गवळी, ज्ञानेश्वर जाणे, विजय निलजे, गजानन आढाव, रवी भालतडक, आदित्य भालतडक, भिकाजी वानखडे, विजय महाले, विजय निलंजे, सुनील पाटील, विनोद गवई, विकास गवई, विष्णू गवळी, सागर लादे, दिलीप राऊत, रामकृष्ण लादे, राजेंद्र राखोंडे, ज्ञानेश्वर चोपडे, ज्वाला सिंग राजपूत, ज्ञानेश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर पिसे, अरविंद जाधव, अनिल म्हसाळ, दीपक आकोटकर, रघुनाथ भोंडे, बाळू घुळे, निलेश खिरोळकर, प्रज्वल वानखडे, सखाराम पाटील, अमर पाटील, संजय पाटील, राजूभाऊ नितवने तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



