भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’

नवी दिल्ली येथे केंद्रीय भाजप कार्यालय येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ मोहिमेच्या राष्ट्रीय कार्यशाळा सत्राचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे.पी.नड्डा जी यांनी उद्घाटन केले, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित.
भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार आहे. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे.
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने बाबा साहेबांशी संबंधित स्थळे ‘पंच तीर्थ’ म्हणून विकसित करण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे. त्यांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे.