जनुना ग्रामपंचायत समोर महसूल अदालत कार्यक्रम संपन्न…..

जीडी रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव.. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत , तसेच 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील साहेब, यांच्या संकल्पनेतून , तसेच खामगाव उपविभागीय अधिकारी श्री. पुरी साहेब पुढाकाराने, व खामगाव तहसीलदार श्री सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली महसूल अदालत कार्यक्रम मौजे जनुना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नि. तहसीलदार सोनालीताई भाजीभाकरे तर प्रमुख उपस्थिती सरपंच सौ. अस्मिता ताई गवांदे ह्या होत्या. सर्वप्रथम प्रथमेश पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार सोनाली ताई भाजीभाकरे यांनी महसूल बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे कमी करणे, इत्यादी कामे सदर कार्यक्रमात करण्यात आली. व वादग्रस्त रस्त्याची पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित मंडळ अधिकारी श्री ताटे सर, माजी सरपंच अमोल भाऊ गोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष कुलकर्णी (ग्रा .महसूल अधिकारी) यांनी केले तर संचालन जनुना तलाठी श्री गणेश ठो सरे यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन आर एम राठोड तलाठी यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते….✒️



