महाराष्ट्र

वार्ड क्रं. १२ मधील कुटे वेटाळ जैन गल्लीतील कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठ्याच्या समस्या गंभीर महिलांचा नगरपंचायतीकडे आक्रोश,

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – कुटे वेटाळ व जैन गल्लीतील महिलांची कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत तक्रार दि.२९ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक १२ जैन गल्ली आणि कुटे वेटाळ येथील महिलांनी कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी तक्रार दाखल केली आहे या भागातील नियमित सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे महिलांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कचरा गाडी नियमित येत नसल्यामुळे गल्लीतील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे कचरा गाडी मुख्य रस्त्यावरून जाते,मात्र गल्लीत थांबत नाही महिन्यातून फक्त आठ ते पंधरा दिवसच कचरा गाडी येते,त्यामुळे गल्लीतील कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे याशिवाय,गाडीसाठी नियुक्त कर्मचारीही अनुपस्थित असतात. त्यामुळे महिलांना स्वतः कचरा गाडीत कचरा टाकावा लागत आहे,ही अतिशय गैरसोयीची बाब आहे पाणीपुरवठ्याचा तुटवडा हा आणखी एक गंभीर मुद्दा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कुटे वेटाळ आणि जैन गल्लीतील नळांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे रोजच्या गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तक्रारदार महिलांनी मागणी केली आहे की,पत्रकार हे शहरातील काही समस्या असतात त्यांना फोन द्वारे कळवितात पण सिओ साहेब फोन पण उचलत नाहीत. नगरपंचायत चे सी ओ लक्ष न देत नसल्या मुळे ह्या बाबी नेहमी घडत आहेत, कचरा गाडीचे वेळापत्रक नियमित करण्यात यावे,गाडीत पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा महिलांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,असा इशाराही देण्यात आला आहे तक्रारीवर सह्या करणाऱ्या महिलांमध्ये रेखा अजय रोकडे,वंदना अशोक कुटे,संगीता नामदेव कुटे, कांताबाई प्रकाश वाळले,साधना विलास महाजन,सीमा प्रदीप महाजन,नंदनी गणेश कुटे,सत्यभामा सुरेश कुटे,वैशाली सुशांत वाळले, रूपाली अरुण काढणे आणि पुनम सुनील वाळले यांचा समावेश आहे नगरपंचायतीकडून या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स…
कचरा गाड्यांच्या समस्येवर तोडगा, लवकरच सुरळीत सेवा सुरू होईल
“कचरा गाड्यांचे टेंडर समाप्त झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याचप्रमाणे काही गाड्या नादुरुस्त होत्या मात्र,आता सर्व गाड्या दुरुस्त करण्यात आल्या असून,सेवा सुरळीत सुरू होईल. प्रत्येक गाडीवर दोन्ही कर्मचारी उपस्थित असतील,” अशी माहिती नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक किशोर पंडीत यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button