महाराष्ट्र

मालेगाव नगरपंचायत निवडणुका लांबल्याने नागरी समस्या वाढल्या !”सामाजिक कार्यकर्ता अक्षय पखाले…

आठ वर्षाचा कार्यकाल संपला तरी मालेगाव नगरपंचायत निवडणुका नाहीत…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – मालेगाव नगरपंचायतच्या निवडणुका अजूनही लागलेल्या नाहीत,यामुळे शहरातील नागरी समस्या अधिक गंभीर बनल्या आहेत. लोकसभा निवडणुका संपून तसेच विधानसभा निवडणुका येणाऱ्या २० नोव्हेंबरला आहेत,तरीही आठ वर्षाचा कार्यकाल संपूनही मालेगाव नगरपंचायत निवडणुका घोषित झालेल्या नाहीत,असे सांगून सामाजिक कार्यकर्ता अक्षय पखाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहरात ठिकठिकाणी समस्या विकोपाला गेल्या आहेत पाणी पुरवठा,कचरा व्यवस्थापन,रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे पखाले यांनी स्पष्ट केले की,”नगरपंचायत वर कुठलाच वचक राहिलेला नाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने शहरातील नागरीकांचे हाल होत आहेत.”शहरातील विकासकामे ठप्प असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही पखाले पुढे म्हणाले की,”निवडणुका झाल्या नाहीत यामुळे नगरपंचायतीचा कारभार निष्क्रिय झाला आहे नवीन नेतृत्वाची निवड होणे अत्यंत गरजेचे आहे,जेणेकरून शहरातील विकासाला गती येईल.”अक्षय पखाले यांचे मत आहे की,निवडणुका लांबणीवर पडत असल्याने नागरिकांचे प्रश्न धसास लागण्याऐवजी वाढतच चालले आहेत शहरातील नागरिकांनी याबाबत आवाज उठवून योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे नगरपंचायतीच्या निवडणुका लवकरात लवकर लागाव्यात,अशी पखाले यांची ठाम भूमिका आहे शहराच्या विकासासाठी नगरपंचायत निवडणुका अनिवार्य – अक्षय पखाले…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button