बुलढाणामहाराष्ट्र

आठवडी बाजारातीलदुकानासमोरचे घाणीचे साम्राज्याबद्दल न.प. मुख्यधिकाऱ्याकडे तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । आठवडी बाजारातील दुकानसमुहासमोरील खुल्या जागेतील घाणीच्या साम्राज्याबाबत येथील दुकानदारांनी न.प. मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना परिसर स्वच्छ करण्याबाबत विनंती अर्ज सादर केला. तसेच या खुल्या जागेत खोदलेले खड्डे बुजविण्याचीही विनंती केली.

येथील आठवडी बाजारातील दुकानसमुहासमोरील खुल्या जागेत नेहमीच मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते. तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे या भागात येणारे जाणारे नागरिक निर्धास्तपणे लघुशंका करतात. ज्यामुळे नेहमीकरिता या परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण राहते. याशिवाय या मोकळ्या जागेत मागील काही दिवसांपासून सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र काम बंद आहे. सदर कामावर स्टे आल्याचे ऐकण्यात आले आहे. तरी जोपर्यंत कामास सुरुवात होत नाही तोपर्यंत खोदलेले खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली

आहे. कारण सदर खड्ड्यात आठवडाभरापुर्वी गाय पडून जखमी झाली होती आणि नंतर गायीचा मृत्यू झाला होता. करिता अशा अपघाताच्या घटना टाळण्याकरिता सदरचे खड्डे बुजविणे गरजेचे असल्याचे तक्रारकर्त्यांनी न.प. मुख्याधिकारी यांना सांगितले. यावर न.प. मुख्याधिकारी यांनी खड्डे बुजवून परिसरातील घाण उचलण्याच्या सुचना संबंधितांना देण्याचे आश्वासन दिले.

निवेदनावर प्रमोद अग्रवाल, गजानन तायडे, शे. वसीम शे. इब्राहिम, शेख शारिक वेल्डर, श्रीराम घाटे, संतोष शेळके, योगेश अग्रवाल, विजय सोनपरोते, भागवत पुंडकर, अनिल शेळके, नईम खान आर्दीच्या स्वाक्षऱ्या आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button