तहसील कार्यालय अकोला अंतर्गत गांधीग्राम येथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन महसूल पंधरवाडा साजरा! , आपत्ति व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे होते आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी
गांधीग्राम दि.११ ऑगष्ट ;
आज दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी तहसील कार्यालय अकोला अंर्तगत आपत्ति व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम गांधीग्राम येथे आयोजित करण्यात आला होता.
दि.०१ ऑगष्ट २०२४ ते १५ ऑगष्ट २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे, विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी अकोला, तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनात आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
आपत्ति व्यवस्थापन शोध व बचाव, विविध फ्लोटिंग एड, पुरस्थितीत बचाव, बोटच्या माध्यमातून बचाव कार्य याबाबत माहिती देण्यात आली, या प्रशिक्षनास प्रा, सुधीर कोहचाले, प्रा, शेलेन्द्र मडावी, प्रा, संकेश झालटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, सुनील कल्ले, वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे, मनीष मेश्राम,
मंडळ अधिकारी दत्ता काळे, तलाठी, रवींद्र पाटकर, तलाठी मुकुंद गिरी, तलाठी, लोभेश भगत, श्री राऊत, रवींद्र दराडे, प्रदीप मोहोड, रामभाऊ दोरकर, सिद्धार्थ सुरवाडे, रणजित मोहोड, सिद्धार्थ मोहोड गांधीग्राम येथील सरपंच, पोलीस पाटील, दहीहंडा, गांधीग्राम, येथील नागरिक, स्थानिक बचाव पथक सदस्य उपस्थित होते




