जे ई स्कूल आणि ज्यू कॉलेज मुक्ताईनगर मधील मुलांनी ११ मीटर लांब तिरंगी ध्वजाची काढली यात्रा.

शिक्षण विभाग यांच्या परिपत्रक क्र ७४१/९/८/२०२४ नुसार दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत हर घर तिरंगा या कार्यक्रमाची अंमलबजावणीकरणे
तसेच हर घर तिरंगा अंतर्गत शाळेत तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा मानवंदना,तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड, तिरंगा कॅनव्हास असे विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच दिनांक 13, दि 14 व दि15 ऑगस्ट 2024 या तीनही दिवस प्रत्येक विद्यार्थी व पालकाच्या घरावर, कार्यालयावर, दुकानावरील इमारतीवर, राष्ट्रध्वज उचित पद्धतीने फडकवला जाईल या बाबत देण्यात आलेल्या सूचनांच्या
अनुषंगाने जे ई स्कूल आणि ज्यू कॉलेज मुक्ताईनगर मधील मुलांनी ११ मीटर लांब तिरंगी ध्वजाची “तिरांगायात्रा” काढून घोषणा दिल्या संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने निनादून सोडला.सदर उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना तसेच तिरांगायात्रे दरम्यान देण्यात येणाऱ्या घोषणा आणि ११ मीटर लांब ध्वजाची आपल्याला सुचलेली संकल्पना ,ध्वजाचे महत्व एस आर ठाकूर सर यांनी मुलांना सांगितले .सकाळी ८.३० वाज.क्रीडा शिक्षक एस एम वाढे यांच्या नेतृत्वात क्रीडा शिक्षक एस जे मोरे यांचे मदतीने शालेय प्रांगणातून तिरंगा ध्वज यात्रेला सुरुवात झाली.परिवर्तन चौक, अहिल्याबाई होळकर नगर, तहसील रोड, आनंद ट्रेडर्स या मार्गाने येऊन यात्रेचा समारोप झाला.तिरंगा यात्रे साठी प्राचार्य आर पी पाटील, उपप्राचार्य जे जे पाटील,पर्यवेक्षक एस पी राठोड व्ही डी बऱ्हाटे तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी यात्रेत सहभागी होऊन सहकार्य केले.



