महाराष्ट्रविदर्भ
उद्या हिवरखेड येथे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची काव्य महफिल श्रावणधारा चे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.१० ऑगस्ट | अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे रसिक मित्र मंडळ हिवरखेड द्वारा प्रस्तुत श्रावणधारा या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणसरी सोबतच काव्यसरीत चिंब न्हावून निघण्यासाठी व खळखळून मनसोक्त हसवण्यासाठी रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ०६:३० वा. श्री विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह हिवरखेड येथे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे आगमन होत आहे.
"मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" , "भोंगा वाजलाय , नेता गाजलाय" , "तुले चोरून पाहीन मी" अशा दर्जेदार एकापेक्षा एक गाजलेल्या कवितांवर महाराष्ट्रातील नामवंत असलेले कवी अनंत राऊत यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे.



