“रिठद ते पार्डीतिखे रस्त्यावरील शेतकऱ्याची शेतात जाण्याऱ्या रस्त्याची दुरावस्था “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिठद ते पार्डीतिखे रस्ता २०००-२०२०१ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या रस्त्याचे मातीकाम काम झाले.परंतू हे काम अर्धवट असल्याने त्या रस्त्यावर इतर कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने त्या रस्त्याला परत पांदन रस्त्याचे त्याला स्वरुप आले परंतु सन २०२१ मध्ये रिठद -पार्डी रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ६५ लक्ष रुपयाची उपलब्धता करुन देण्यात आली.त्यामुळे संपूर्ण मातीकाम या रस्त्याचे झाले.हा रस्ता जवळपास पाच कि.मी.चा असून मातीकामच झाल्याने सततच्या संततधार व रिमीझीम पावसामुळे रस्ता संपूर्ण चिखलमल झाला.या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांचे शेतात फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर न्यावे लागतात त्यामुळे रस्ता अंत्यंत खराब झाला.शेतकऱ्यांना व मजुरांना शेतात जाता येईना. लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्यावर बजेट मध्ये निधी उपलब्ध करून देऊन खडीकरण, डांबरीकरण आणी आवश्यक तेथे पूलाचे काम करुन देण्यात यावे.याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी जवळपास तिन कोटी बारा लक्ष रुपये बजेटमध्ये मंजुरी मिळण्यासाठी २९डिसेंबर २०२३ ला ५०५४ अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे समजते.हा रस्ता दर्जोन्नत झाला.प्रजिमा ५९ क्रमांक आहे.त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो.तरीसुद्धा लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन खडीकरण डांबरीकरण व आवश्यक तेथे पूलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे.



