शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 1 मधील मुख्य रस्त्यावर मुरूम टाकण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांनी दिले निवेदन.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 1 मधील पिर मोहम्मद शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर मधोमध पावसाच्या पाणी साचल्याने सर्व परिसर चिखलमय झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व इतर वाहनधारक या सर्वांना रस्त्यावरून येण्याजाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे या त्रासापासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायतीमार्फत मुरूम टाकने खूप गरजेचे आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने काही भागात कायम दुर्लक्ष दिसून येत आहे.
दरवेळी पावसाळ्यात आम्हाला पायी चालणेही मुश्किल होते प्रशासनाने त्यामुळे ग्रामपंचायत ने हा मुख्य रस्ता आम्हाला व्यवस्थित करून द्यावा”
तसेच मोटरसायकल,चार चाकी वाहनाने जाताना ते वाहने बरेच ठिकाणी फसलेली आढळून येतात पायी चालणे सुद्धा मुश्किल झालेले आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन त्वरित हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक करत आहेत. शिरपूर ग्रामपंचायत यांना निवेदन द्वारे केली मागणी.



