दुधाची तहान ताकावर, संपूर्ण कर्ज माफी योजना 2150 शेतकरी आठ कोटीच्या कर्जमाफीस पात्र!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
PD दांडगे (जळगाव जामोद) व संग्रामपूर
(सोनाळा): सततची नापीक व अतिदृष्टी यामुळे अर्थचक्र चिखलात अडकलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना आशेचा एक किरण मिळाला आहे. डुबट्याला काठीचा आधार याप्रमाणे भारतीय स्टेट बँक ने थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऋण समाधान योजना सुरू केली आहे.
सोनाळ शाखेच्या सातपुड्यातील 2150 शेतकरी उपरोक्त योजनांसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांकडे सोडा कोटी 27 लक्ष रुपयांचे विविध कर्ज थकीत आहेत. त्यांना थकीत कर्जदार सुमारे 50 टक्के सवलत ऋण समाधान योजनेत मिळत आहे. परिणामी आठ कोटी 16 लाख रुपयांची बंपर कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र ठरले आहेत. यामुळे कर्जमुक्ती बरोबर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणार असल्याने ते नवीन पीक हंगामात पीक कर्ज घेण्यासाठी सुद्धा पात्र ठरणार आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत ही योजना असल्याने शेतकरी यासाठी प्रतिसाद देत आहेत. संपूर्ण कर्जमाफी केवळ डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. थकीत कर्जदार शेतकरी आर्थिक संकटात असताना स्टेट बँकची ही 50 टक्के कर्जमाफीच्या योजनेमध्ये कर्जमाफीची रक्कम ची तजवीज लावताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
भारतीय स्टेट बँक ने याबाबत 2150 पात्र शेतकऱ्यांशी संपर्क साधून ऋण समाधान योजनेच्या कर्जमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



