जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न…

जळगांव जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)” बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव येथे केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी बैठक अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, ॲड.एसपी श्री. नखाते, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, डीएफओ श्री. जमीर शेख व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button