सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास शक्य .प्रा.डॉ. सुनीता नेमाडेमुक्ताईनगर

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास शक्य .प्रा.डॉ. सुनीता नेमाडेमुक्ताईनगर : येथील श्रीमती जी. जी . खडसे महाविद्यालयातील प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या (PM USHA)सॉफ्ट कॉम्पोनंट अंतर्गत व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या सयुक्त विद्यमाने “ NEP 2020 & Evaluation Reforms (CCE) “ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. सुनिता नेमाडे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तसेच शिक्षण प्रक्रियेतील महत्वपूर्ण घटक सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयावर प्राध्यापकांशी संवाद साधला. त्यांनी मूल्यमापनाचे तंत्र विशद करताना , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्तरनिहाय उद्दिष्टे निश्चित केली जातात. ही उद्दिष्टे अध्ययन – अध्यापन प्रक्रिया, विविध अध्ययन अनुभूती देऊन साध्य केली जातात. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास साधला जातो. विद्यार्थ्यांचा विकास होत असताना तो योग्य दिशेने होतो आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी, वेगवेगळ्या पद्धतीने, विविध साधनतंत्रांच्या मदतीने मूल्यमापन करणे गरजेचे आहे. सारांश, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल, असे मत प्रतिपादित केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर मार्गदर्शन करताना “भारतीय विद्यार्थी हा जागतिक स्तरावरील स्पर्धेत सक्षमपणे उभा राहावा या अनुषंगाने शैक्षणिक बदल स्वीकारून प्राध्यापकांनीही शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अद्यावत असणे आवश्यक आहे,” असे मत प्रतिपादित केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एम. उषाचे समन्वय प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दत्तात्रय कोळी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पी.एम. उषाचे सहसमन्वयक प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.



