गुन्हेगारीमहाराष्ट्रसामाजिक

बुलढाण्यात भलतेच कांड!डॉ. सौरभ संचेतींना साडेआठ लाखांनी लुटले; प्रकरणाला समलिंगी संबंधाची किनार , डॉक्टरला नग्न केले, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

बुलढाणा शहरातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ सौरभ संचेती यांना एका टोळक्याने अश्लील व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत साडेआठ लाख रूपयांनी लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एवढ्यावर देखील त्या तरुणाच्या टोळक्याची भूक लागली म्हणून त्यापैकी एक तरुण पुन्हा डॉक्टरला पैसे मागायला घरी गेला, न दिल्यास मुला बाळांना कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर डॉक्टर त्या तरुणांना वैतागल्याने डॉक्टरांनी बुलढाणा शहर पोलीसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ७ ते ८ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ५ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अजय नागपुरे, दिक्षांत नवघरे, विशाल गायकवाड, सुरज पसरटे, आदेश राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून उर्वरित ३ आरोपी अद्याप फरार आहेत. डॉ. संचेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटना, १३ ऑक्टोबरची आहे. घटनेच्या दिवशी दुपारी डॉक्टरांना एक फोन आला, डॉक्टरांना परिचित असलेल्या अजय नागपुरे याची ओळख दाखवत घरी एक कॅन्सर चा पेशंट आहे, तुम्ही तपासायला घरी येऊ शकता का अशी विचारणा केली व स्वतःचे नाव दिक्षांत नवघरे असल्याचे सांगत घराचा पत्ता विजय वाईन बार, खामगाव रोडच्या बाजूला शाहू कॉलेजला जाणारा रोड असल्याचे सांगितले.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलणे झाल्यावर ते स्वतःच्या स्कुटीने डॉक्टर संचेती दिलेल्या पत्त्यावर गेले. तिथे रस्त्यावरील बाईकवर इसमाने हात देऊन त्याने तो दिक्षांत नवघरे असल्याचे सांगितले, मीच तुम्हाला फोन केला होता असे म्हणत दिक्षांत डॉक्टर सौरभ यांना घेऊन घरी गेला. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार”त्या” घरात २० ते २५ वयोगटातील ७ ते८ तरुण होते. त्यांनी एकाएकी डॉक्टरांच्या हातावर, कानावर, पाठीवर मारहाण केली. कोयत्या सारख्या शस्त्राचा धाक दाखवून डॉक्टरांच्या पॅडच्या खिशातून १० हजार रुपये काढले. डॉक्टरच्या अंगावरील कपडे काढून नग्न केले, दीक्षांत यांच्याही अंगावरील पूर्ण कपडे काढलेले होते. डॉक्टरला दीक्षांतच्या जवळ उभे करून त्यांचा अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांना आरोपी तरुणांनी दुचाकीने वृंदावन नगरातील मोकळ्या जागेत नेले. तिथे २ ते३ जण पांढऱ्या कारमधून आले, त्यांनी आपसात चर्चा केली. तिघे डॉक्टरांचा परिचित अजय नागपुरे होता.”हे लोक तुमचा व्हिडिओ व्हायरल करतील, तुमच्या मुलांच्या जीवाचे बरे वाईट करतील, तुम्ही त्यांना २० लाख रुपये द्या, बाकी मी पाहून घेतो”असे अजय डॉक्टरला म्हणाला. डॉक्टरने घाबरून मित्र राहुल कोटेचा त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेऊन आरोपी तरुणांच्या जवळ दिले…
दरम्यान या घटनेनंतर दिनांक १८ ऑक्टोबरला डॉक्टरला पुन्हा दिक्षांत यांचा फोन आला. मला तुम्हाला भेटायचे आहे असे त्यांने सांगितले तेव्हा डॉक्टरांनी हॉस्पिटलला भेटायला बोलावले. दिक्षांत डॉक्टरच्या केबिनमध्ये भेटायला आला, तुमचा लग्न व्हिडिओ माझ्याकडे आहे, उर्वरित पैसे असे दिक्षांत मला म्हणाला. यावेळी डॉक्टरांनी हॉस्पिटल मॅनेजरला केबिनमध्ये बोलावले असता दिक्षांत निघून गेला. आरोपी आपल्याला सातत्याने त्रास देतील देतील अशी खात्री झाल्याने डॉक्टर संचेती यांनी बुलढाणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली…
पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अजय नंदकुमार नागपुरे (३०,रा. शिवशंकर नगर बुलढाणा) याला राहत्या घरून अटक केली. गुन्हा दाखल होत असल्याची कुण कुण लागल्याने आरोपींनी प्रसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ३ पथके रवाना केली. छत्रपती संभाजी नगर जवळून पोलिसांनी दिक्षांत नवघरे, विशाल मनोहर गायकवाड, आदेश सुनील राठोड व सुरज राठोड पसरटे यांना अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक
बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर करीत आहेत..!
दरम्यान या प्रकरणाला समलिंगी संबंधाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला दिशांत हा याआधी खुणाच्या प्रकरणातील आरोपी आहे. वर्षभर आधी जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुका येथील एका जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका कक्ष सेवकाचा समलिंगी संबंधातून खून करण्यात आला होता व प्रेत राजुर घाटाजवळील एका शेतात टाकण्यात आले होते. आधी एका घरात कक्ष सेवकांचे अश्लील व्हिडिओ आरोपींनी काढले होते ‌. त्यानंतर त्याला पैशासाठी मारहाण करीत असताना कक्ष सेवकाचा मृत्यू झाला होता. बुलढाणा समलिंगी संबंधात अडकवून आर्थिक लूट करणारी टोळी सक्रिय आहे का याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणाची दुसरी बाजू देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पोलीस तपासात यातील बऱ्याच बाबी स्पष्ट होतील…!!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button