बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाण्याच्या माजी खासदारांचा गेम झाला; तिकीट कटलं! म्हणाले तरीही मी उभा राहणार..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा): लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र तिथे भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयाने आनंदराव अडसूळ प्रचंड नाराज झाले आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राखी होता तेव्हा तब्बल ३ वेळ आनंदराव अडसूळ शिवसेनेकडून विजयी झाले होते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर आनंदराव अडसुळ यांनी राखीव झालेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत दिल्ली गाठली होती. मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अडसूळ यांनी एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघाने शिवसेनेने दावा सांगितला होता, मात्र भाजपने आज थेट यादी जाहीर करून नवनीत राणा यांना उमेदवार बनवले आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली.”चर्चा सुरू असताना भाजपने एकतर्फी उमेदवारी घोषित केली. नवनीत राणा यांना मतदारसंघात प्रचंड विरोध आहे, ही राजकीय आत्महत्या आहे. सगळे नेते नवनीत राणा यांच्याविरोधात आहेत. काहीही झाले तरी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत”असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button