क्राईममहाराष्ट्र

रामानंद नगर पोलीसांनी खुनातील 02 आरोपीतांना केली अटक

जळगाव प्रतिनिधी

रामानंद नगर पो स्टे जळगांव

दि.23/01/2025

रामानंद नगर पोलीसांनी खुनातील 02 आरोपीतांना केली अटक

रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील पिंप्राळा हुडको, परिसरात दि. 19/01/2025 रोजी दाखल खुनाच्या गुन्हयातील फरार असलेले इतर आरोपीतांना रामानंद नगर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी दि.23/01/2025 रोजी कानळदा रस्ता येथुन ताब्यात घेतले.

रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. 33/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1),109 वगैरे प्रमाणे दि. 19/01/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलीसांनी गुन्हयातील 06 आरोपीतांना दि. 19/01/2025 रोजीच अटक केली आहे. तदनंतर यातील संशयित आरोपी हे पसार झाल्याचे कळताच रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी टिम तयार करुन सदर आरोपीतांचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ, रामानंद नगर यांना दि.23/01/2025 रोजी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हे जळगांव शहरातील कानळदा रस्ता, बडाजटाधारी महादेव जवळ एका शेतात लपुन आहेत असे समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तेथे जाऊन सदर आरोपीतांना अटक करणेचे आदेशीत केल्यावरुन सदर ठिकाणी जाऊन सदर गुन्हयातील आरोपी नामे 01) राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे वय.21 आरोपी क्र.02 शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे वय-26 वर्षे दोन्ही राहणार बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको, जळगांव यांना सापडा रचून अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाने सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ सहा. पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफी संजय सपकाळे, पोहेको इरफान मलिक, पोना/हेमंत कळसकर, पोना/रेवानंद साळुखे, पोशि/रविंद्र चौधरी, पोशि/उमेश पवार पोशि/जुलालसिंग परदेशी अशांनी पार पाडली

पोलीस निरीक्षक, रामानंद नगर पो.स्टे. जळगांव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button