Uncategorized
अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
नांदुरा येथील सोयाबीनच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्या केली. याबाबत
अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत. नांदुरा रेल्वे स्टेशनच्या मागील भागात असलेल्या दिपक गायकवाड यांच्या सोयाबीनच्या शेतात आज सकाळी 11 वाजेदरम्यान एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या
बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी की घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. सदर मृतक की महिलेने लेगी व स्टॉल घातलेला असून ही हत्या की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.



