मौजे जनुना येथे कृषी योजनेच्या विविध माहिती मेळाव्याचे आयोजन कार्यक्रम संपन्न……

मौजे जनुना येथे कृषी योजनेच्या विविध माहिती मेळाव्याचे आयोजन कार्यक्रम संपन्न……
(जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
जनुना तालुका खामगाव येथे 24 ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध योजनेच्या जनजागृतीसाठी या कृषी योजनेचा माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी चे निमित्ताने कृषी विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक जनुना ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले होते ..कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सौ. सुवर्णाताई गोरे सर्व गावातील शेतकरी वर्ग तसेच कृषी विभागाचे श्री ठोसर सर अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वप्रथम कृषी अधिकारी साहेब यांनी ही पीक पाहणी बद्दल सखोल मार्गदर्शन केले. व शासनाच्या कृषी विषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..



