बुलढाणा

*अकोला एलसीबी पथकाची धडक कारवाई; चोरीच्या दुचाकी जप्त*

स्टार भारत लाईव्ह एक्षप्रेस्स अकोला प्रतिनिधी : दत्ता सुलताने अकोला : जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Akola Lcb)प्रयत्न केले होते.दरम्यान, दुचाकी चोरीच्या घटनेत दोन तरुणांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या घटना उघडकीस आणल्या.पोलिसांच्या चौकशीत दोन आरोपी उघडकीस आले असता,त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 8 गुन्ह्यांतील 9 दुचाकी हस्तगत करण्यात यश आले.जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व एलसीबीला वाहन चोरांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महाल्ले यांनी सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक तैनात केले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी गांभीर्याने घेत पथकाने तपास करून वाहन चोरीच्या घटनेत दोन तरुणांचा सहभाग असल्याची माहिती दिली.या माहितीच्या आधारे पथकाने शाहरुख खान,सलीम खान,प्रेम राजेश मीरजकर यांना अटक केली.पोलीस चौकशीत आरोपींनी तीन ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची माहिती दिली होती.पोलिस चौकशीत त्याने सय्यद समीर सय्यद सलीम,दानिश उर्फ राजा पठाण फिरोज खान यांचा या चोरीच्या घटनेत सहभाग असल्याचे सांगितले.या माहितीच्या आधारे पथकाने त्यालाही अटक केली.आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.आरोपींनी सिटी कोतवाली 4,रामदास पेठ 2,रेल कॉम्प्लेक्स येथे चोरीच्या घटना घडवून आणल्या आहेत.ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत,शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महाल्ले,एपीआय गोपाळ ढोले,फिरोज खान,इस्माईल खान,खुशाल नेमाडे,आकाश मानकर,मोहम्मद आमिर,धीरज वानखडे,चालक अक्षय बोबडे,प्रवीण कश्यप,महिला पोलीस अधिकारी तृष्णा घुमान यांनी केली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button