महाराष्ट्रविदर्भ

पोळा घरगुती पद्धतीने साजरा करा, बैलपोळा भरू नका! नव नियुक्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील धडकी भरवणारा पहिला देश; वाचा काय आहे कारण….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

पदभार स्वीकारल्यानंतर पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा पहिलाच आदेश धडकी बनवणार आहे.
शेतकऱ्यांचा प्रिय असलेला बैलपोळा उद्या शेतकऱ्यांना सार्वजनिक पद्धतीने साजरा करता येणार नाही. तसा आदेशात जिल्हाधिकाऱ्याने काढला आहे, अर्थात शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा आदेश काढण्यात आला आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश दिले आहेत.
डॉ.ह.पी. तू मोड यांची बदली झाल्यानंतर काल,१२९ सप्टेंबरला डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा
जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. काल त्यांनी विविध विभागाप्रमुखांच्या बैठकीत त्यांना कामकाजा संदर्भात सूचना दिल्या. दरम्यान त्यांच्या स्वाक्षरीचा पहिला आदेश पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर निघाला आहे.
जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव आहे. हा संसर्गजन्य असल्याने बैलांना एका ठिकाणी एकत्र आणल्यास त्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे बैलपोळा सार्वजनिक पद्धतीने न भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली आहेत.
याविषयी गुरांचे बाजार भरवणे, प्राण्यांची जत्रा भरवणे याकरिता देखील बंदी घालण्यात आली आहे. या देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे कारवाई होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button