महाराष्ट्र

बस स्टँड परिसरातील दुचाकी लंपास

बस स्टँड परिसरातील दुचाकी लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव येथील बसस्थानक परिसरातून बजाज पल्सर कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. सिद्धेश्वर नगर येथील रहिवासी अजय प्रकाश तायडे हे अकोट येथे दुकानाच्या कामाने अपडाऊन करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे बसस्थानक परिसरात आपल्या मालकीची दुचाकी क्र. एमएच २८- बीएच – २९८४ ( किं. ४५ हजार रू.) उभी करून बसने अकोट येथे गेले. त्याच रात्री ८ वाजता परत आल्यानंतर त्यांची दुचाकी उभ्या केलेल्या जागी दिसली नाही.

तसेच बसस्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची मागणी बसस्थानक कर्मचाऱ्यांना केली असता त्या ठिकाणचा सीसीटिव्ही कॅमेरे बंद -असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button