शेगांव मध्ये मोठी घरफोडी* दिडकिलो सोने,दोन चांदी 25 लाख नगदी एकत्रित अंदाजे92 लाखाचा मुद्देमाल लंपास

शेगांव मध्ये मोठी घरफोडी* दिडकिलो सोने,दोन चांदी 25 लाख नगदी एकत्रित अंदाजे92 लाखाचा मुद्देमाल लंपास
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी
श्याम पहुरकरशेगांव
शहरातील मटकरी गल्लीत आनंद पाडलीवाल यांचे घरी दि 15 जानेवारी रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधत मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत अज्ञात चोरट्यानी मध्यरात्री च्या दरम्यान कपाटातील,लॉकर मधील नगदी 25 लाख रुपये व 1500 ग्राम सोने ,दोन किलो चांदी, व डायमंड सेटवर हात साफ केला आहे अंदाजे 92 लाख 50 हजाराचा रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी पसार केला आहे आनंद पाडलीवल आज दि 16 जानेवारी रोजी घरी आले असताना सदर घटना उघडकीस आली घटनास्थळी फिंगर प्रिंट एक्सपर्ट, श्वान पथक दाखल झाले होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी , ठाणेदार आनंद गोपाळ यांचेसह प्रचंड पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस घराजवळील तसेच शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून वृत्त लिही पर्यंत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यामध्ये हिरे जवाहिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात लंपास झाल्याने 1 कोटीच्या वर ही घरफोडी जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे



