खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद; ३४८ रुग्णांनी घेतला लाभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे दि. १ सप्टेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले व नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरात छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन व औषधोपचार केले. ३४८ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयात या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन विद्याधर महाले व नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व्यास, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनील लाहोटी, नगर परिषदेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे व माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सावजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणातून विद्याधर महाले यांनी समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान आरोग्य क्षेत्रात करत असलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी या आरोग्य शिबिराचा गरीब व गरजू रुग्णांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. डॉ. आशुतोष गुप्ता यांचे देखील समयोचित भाषण झाले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकू लोळगे यांनी केले व व्यवस्थापीका सौ किरण तायडे यांनी आभार मानले.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, किडनीचे आजार, हाडांचे व मणक्याचे आजार, बालरोग आणि स्त्रियांच्या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे तज्ञ डॉ. स्वप्नील सांभापुरे, डॉ. कैवल्य दंडवते, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. भाग्यश्री खडके, डॉ. नितीन घुबे, डॉ. हेमंत राठोड, डॉ. राम दळवी यांनी केली. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली संचालित डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना गुल्हाने, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. पंकज शेटे, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. जयेश काछवाल, सु. रा. चुनावले आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीक्षक पवन लढ्ढा, डॉ हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आंतरवासिता विद्यार्थी तसेच रुग्णालयातील सर्व पॅरामेडिकल व नॉन मेडिकल कर्मचारी यांनी रुग्ण तपासणीच्या कार्यात सहकार्य केले.
शिबिराच्या आयोजनासाठी समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वैभव भागवतकर, सचिव संजय भालेराव, सहसचिव श्रीकृष्ण यंडोले, कोषाध्यक्ष सतीश बिडकर, संचालिका सौ कविता मुळे, सौ गीता कुटे, संचालक सखाराम राऊत, कैलास इंगळे तसेच सत्यनारायण कुटे, अर्जुन मुळे व शुभम इंगळे यांनी पुढाकार घेतला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button