बुलढाणामहाराष्ट्र

जनुना तलावात युवकाचा मृतदेह आढळला आत्मर्हत्या केल्याचा संशयप्रतिनिधी राजेंद्र मुंढेखामगाव : येथील जनूना तलाव येथे एका इसमाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज 3 एप्रील रोजी सकाळी काही इसम नेहमी प्रमाणे जनुना तलाव येथे फिरण्यासाठी गेले असता त्यांना तलावातील छत्रीजवळ पाण्यावर एका इसमाचा मृतदेह तरंगतांना दिसून आला.

यावेळी नागरीकांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सदर इसमाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात

पाठविण्यात आला आहे. सदर युवकाने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. सदर युवक हा घरून बेपत्ता झाला होता. त्याचे नाव सुनील वसंता इंगळे रा. सिरजगाव देशमुख वय 26 वर्ष असे असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button