आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

मोठी बातमी : पंतप्रधान मोदी राज्यात घेणार ८ सभा !

जळगाव प्रतिनिधी | २४  ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. राज्यात अनेक दिग्गजांनी आज गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज भरले. चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी शक्तीप्रदर्शन करत आपले नामांकन दाखल केले. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी भरण्याची तारीख असून त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या राज्यात 8 सभा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. या 8 दिवसांत ते विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतील. पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी फारसा वेळ नसणार. त्यामुळे या 8 दिवसांत मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुती भर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाजपच नाही तर महायुतीच्या घटक पक्षातील उमेदावारांच्या प्रचारासाठी सुद्धा सभा घेतील.

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याची माहिती आहे. केजरीवाल महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच इतर घटक पक्षांचा प्रचार करणार आहेत. मात्र, ते काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांची राज्यात विभागवार सभा होणार असल्याची देखील माहिती आहे. महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचे संघटन काहीच भागात असून त्या मतदानाचा फायदा महायुतीला होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना प्रचाराचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button