शेगाव कालखेड रस्त्यावर एसटी मध्येच बंद पडली प्रवाशांचे हाल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगांव :- कालखेड रस्त्यावर मध्येच बंद पडली एसटी महामंडळाच्या भंगार बसेस या मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतांना सुद्धा एसटी महामंडळाच्या भंगार बसेस रस्त्यावर चालत असल्याचं पाहायला मिळतोय या भंगा बसेल फटका सर्वसामान्यांना बसतांना पाहायला मिळतोय शेगावकडे 20 ते25 प्रवाशांना घेऊन निघालेली महामंडळाची एसटी बस मध्येच नादुरुस्त झाली आहे सातत्याने एसटी महामंडळाच्या या भंगार बसेस रस्त्यावर बंद पडत आहेत तर कुठे या भंगार बस मुळे मोठे अपघातही होत आहेत मात्र एसटी महामंडळाला या भंगार बसेस दुरुस्त करण्याकरता वेळ नाही त्यामुळे या नादुरुस्त
बसेस रस्त्यात बंद पडत असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या ह्या भंगार बसेस तात्काळ दुरुस्त करून किंवा त्याऐवजी नव्या बसेस महामंडळाने विकत घ्याव्या अशी मागणी प्रकासी करू लागले आहेत महामंडळ या भंगार बस पुढे एवढा मोठा अपघात पाहत आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपयोग केला जातोय



