अकोलामहाराष्ट्र

लेडी हार्डिंगमध्ये दोन जुळ्या निष्पाप बाळांचा बळी! तातडीने ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची सम्राट अशोक सेनेची मागणी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

वृत्त संकलन

अकोला दि.२५ जून | स्थानिक शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग ) चा भोंगळ कारभार आणि डॉक्टरांच्या कथित अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चुकीच्या उपचार पद्धतीमुळेच या माउलींचे मातृत्व हिरावले गेल्याचा संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सम्राट अशोक सेना व सामाजिक कार्यकर्त्यांनी काल दि.२५ जून रोजी रुग्णालयात थेट धडक दिली. जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याने संतापलेल्या आंदोलकांनी थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षातच तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली.
अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहून संताप भडकला या धक्कादायक प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाट व इतर पदाधिकारी व नातेवाईक जेव्हा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले तेव्हा तेथे एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. दोन निष्पाप जीवांचा तडफडून अंत झालेला असताना प्रशासनाची ही संतापजनक उदासीनता पाहून आंदोलकांचा धीर सुटला. त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या रिकाम्या कक्षातच जमिनीवर ठाण मांडले आणि रुग्णालय प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत दोषी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा आकाश शिरसाट व आंदोलकांनी घेतला. या रणकंदनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिय्या आंदोलन सुरू केल्याने लेडी हार्डिंग परिसर कमालीचा तापला होता.
एका पीडित मातेला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीची वेळ अत्यंत संवेदनशील असतानाही तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. चुकीची ट्रीटमेंट केली यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने शेवटी जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. असा थेट आणि गंभीर दावा नातेवाईकांनी केला आहे.

मुख्य मागण्या –

१) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ज्यांच्या कथित चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि हलगर्जीपणामुळे निष्पाप जुळ्या बाळांचा मृत्यू झाला त्याच्या आईचा सुद्धा मृत्यू होता होता वाचला म्हणून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
दोन निष्पाप जीवांचा बळी गेला असतानाही मुख्य पदांवरील अधिकारी जागेवर नसणे. ही शासकीय यंत्रणेची अत्यंत संतापजनक आणि क्रूर मनमानी आहे. लेडी हार्डिंग रुग्णालयातील हा जीवघेणा कारभार आता खपवून घेतला जाणार नाही.

२) प्रशासनाने तातडीने दोषींवर फौजदारी कारवाई केली नाही तर संपूर्ण अकोला जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करून तीव्र जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो.

-आकाश शिरसाट अध्यक्ष सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.

सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, बाळांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातले अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आश्वासन मुख्य पदावर असणाऱ्या डॉक्टरांनी व रुग्णालय प्रशासनाने दिले.
३) गैरहजर अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई . एवढी मोठी आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली असतानाही मुख्य कर्तव्यावर हजर नसलेल्या आणि पळ काढणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई व्हावी. वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करा. ४) चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करण्यात यावा. जेणेकरून पुन्हा अशी बेजबाबदार वृत्ती समोर येणार नाही.

आंदोलन प्रसंगी वैभव इंगळे, सनी सरदार, अजिंक्य इंगळे, निखिल गायकवाड, धनंजय चक्रनारायण, सम्यक डोंगरे, व इतर नातेवाईक कार्यकर्ते उपस्थित होते,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button