खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

देर न हो जाये कही देर न हो जाये!

देर न हो जाये कही देर न हो जाये! उजनीला उर्सची कव्वालीचा मुकाबला होता. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे या दोघांना निमंत्रण दिले होते. निमंत्रण पत्रिकेत आयोजकांनी दोन्ही भाऊंचे फोटो छापले होते. दोन्ही भाऊ येणार म्हणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थाही करून ठेवली होती. कव्वालीचा मुकाबला रंगला होता. त्याच वेळी देर न हो जाये…..कही देर न हो जाये….ही कव्वाली सुरू झाली….असा रंगत असताना परंतु दोन्हीपैकी कुणीच वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तरीही भाऊ येतील या आशेवर कार्यकर्ते वाट पाहत होते. रसिक मात्र दोन्ही भाऊ मुकाबल्यात का पोहोचले नाहीत म्हणून चर्चा करू लागले…. पहिला म्हणाला… एकाने तरी यायला पाहिजे होतं… आपल्याच मतदारसंघाचा कार्यक्रम आहे…. दुसरा म्हणाला… वेळ झाली म्हणून दोघेही आले नसतील… इकडे कव्वालही ढोलकीच्या तालावर रंगून गेले होते….. कव्वालनेही देर न हो जाये कही देर न हो जाये… सुरू केलं आणि चर्चा करणारे कार्यकर्तेही मग आता वेळ झाली आहे…. असे म्हणत तेही कव्वालीच्या रंगात रंगले. पण शेवटपर्यंत भाऊ पोहोचलेच नव्हते…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button