नवरंग गणेश मंडळाची कार्यकारणी जाहिर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव :- मालेगांव येथील नवरंग गणेश उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली नंतर मंडळाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अमोल दंडगे , उपाध्यक्षपदी अक्षय सावले , सचिवपदी आशिष जोगदंड सदस्यपदी अतुल भांडेकर , सदस्यपदी राहुल भांडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नवरंग गणेश उत्सव मंडळ गेल्या 54 वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करीत आलेला आहे या वर्षाचा उत्सव देखील दरवर्षीप्रमाणे साजरा करण्याचे ठरले असून नवनिर्वाचित कार्यकारणी जाहिर करण्यात आली तसेच गणेशोत्सववाच्या दहा दिवसात घेण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले मंडळाच्या अध्यक्ष अमोल दंडगे उपाध्यक्ष अक्षय सावले , सचिव आशिष जोगदंड , सदस्य अतुल भांडेकर , सदस्य राहूल भांडेकर यांची निवड करण्यात आली या बैठकी वेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.



