बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्हा बँकेवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड; देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा फटाके फोडून जल्लोष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;शंकर शिवरकर

बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

देऊळगाव राजा:बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल आज देऊळगाव राजा येथील प्रमुख बस स्थानक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जोरदार जल्लोष करण्यात आला.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच देऊळगाव राजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आज सायंकाळी शहरातील बस स्थानक चौकात पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. कार्यकर्त्यांनी ‘डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब आगे बढो’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले की, डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा बँकेतील योगदान आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव पाहता ही निवड अपेक्षेप्रमाणेच झाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या जल्लोष आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक आघाडी, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि डॉ. शिंगणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे बस स्थानक परिसर काही काळ गजबजून गेला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button