खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पत्र्याच्या शेडमध्ये भरतेय शाळा; साप-विंचू आणि माकडांच्या दहशतीत विद्यार्थी घेतायत धडे!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : शंकर शिवरकर

देऊळगाव राजा नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे जीवलग प्रश्न,नव्या इमारतीला तात्काळ संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

देऊळगाव राजा :येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीभोवती तातडीने संरक्षण भिंत (वॉल कंपाऊंड) बांधण्यात यावी, या मागणीसाठी मुख्याधिकारी अरुणजी मोकळ आणि नगराध्यक्ष माधुरीताई शिपने यांना नुकतेच एक निवेदन सादर करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेची भव्य व नवीन इमारत पूर्णपणे तयार आहे. मात्र, केवळ संरक्षण भिंत (वॉल कंपाऊंड) नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या नव्या इमारतीत स्थलांतरित करता येत नाही. परिणामी, शेकडो विद्यार्थ्यांना सध्या अत्यंत असुरक्षित आणि गैरसोयीच्या वातावरणात पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रशासनाने तात्काळ संरक्षण भिंत बांधून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी तीव्र मागणी आता पालकांमधून होत आहे.पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षणाचे धडे, वाढती विद्यार्थी संख्या ठरतेय अडचणसदर शाळा सध्या लिलाव भवन येथील पर्यायी व्यवस्थेत भरत आहे. या शाळेतील पटसंख्या सातत्याने वाढत असून, सध्याची तात्पुरती व्यवस्था विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरी पडत आहे. विद्यार्थी सध्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. उन्हाळ्यात येथे प्रचंड उष्णता जाणवते, तर पावसाळ्यात पत्र्यांवर पडणाऱ्या पावसाच्या मोठ्या आवाजामुळे शिक्षकांचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे अध्यापन आणि अध्ययनात गंभीर अडथळे निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.साप, विंचू आणि माकडांची दहशत!ज्या ठिकाणी ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे आणि बिळे आहेत. त्यामुळे वर्गाच्या आसपास साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा वावर असतो. तसेच, पत्र्याच्या शेडचा वरचा भाग उघडा असल्यामुळे शाळेच्या वेळेत माकडे थेट वर्गात आणि परिसरात घुसतात. यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.संरक्षण भिंत बांधल्यास सुटणार प्रश्नशाळेची हक्काची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने केवळ या इमारतीभोवती संरक्षण भिंत उभारल्यास, विद्यार्थ्यांना सुरक्षित, प्रशस्त आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक हित लक्षात घेता, प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, तात्काळ युद्धपातळीवर वॉल कंपाऊंडचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिक व पालकांकडून केली जात आहे.

या निवेदनावर जागरूक नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून मुख्य अधिकारी अरुणजी मोकळ आणि नगराध्यक्ष माधुरीताई शिपने यांनी या समस्येवर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन देताना उपस्थिती,सरिता खानंद कुळ‌कर्णी,सौ. अमृता उद्‌बोध पैठणकर,सौ. स्वाला आकाक। लिधोरीया,सौ. भाग्यश्री, आनंद मराडे,सो सविता रामप्रसाद ताठे,सौ धनश्री आदित्य दहिवाळ,सौ. भारती निलेश काळे,यो सुनिता दिनेश कमि,सौ. शुभांगी सुरेंद्र भंडारे,सौ वर्षा विष्णू हविले,सोशकुंतला पशेराव पवार,यमुना पवार,वर्षा सदाशिव घुगे,प्रिती आकलेश डोईफोडे,वैशाली जितंद्र मुंढे,ज्योती शिवकुमार शिंगणे,अश्विनी प्रशांत गव्हाणे,मयुरी अमित सपाट,सुरेखा उध्दव वाध सौ. कल्पना जालिंदर मेहेते,सौ. स्वाती संदीप नागरे,सो. दिपाली कृष्णा जाएव,सौ. छाया रानु राजु निनादे,सौ जया विशाल नागर,सौ. अश्विनी सिध्दांत खडिभराड,श्री प्रकाश हत्तु शिंदे,जालीदर ऋजीकात,विलास प्रभाकर जगताप,मजालन भिमराव सररी,सिताराम गोविंद शिवरपूर्, प्रदिप राजाराम खांडेभयड,विजय रुपसिंग पवार,गणेश गजानन कुनउच्छे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button