डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतीगृहात शिकणाऱ्या ६ मुलींना अन्नातून विज बाजार झाल्याचे समोर आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
चिखली शहरातून एक खळबळ समोर आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतीगृहात शिकणाऱ्या ६ मुलींना अन्नातून विज बाजार झाल्याचे समोर आले मुलींना मध्यरात्री २ वाजता चिखली शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चिखली शहरात मुलींची शासकीय वसतिगृह आहे. या वस्तीगृहातील ६ मुलींना अत्यवस्थ असेच रात्री चिखलीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अळ्या पडलेले अन्न खाल्ल्यानेच त्या मुलींना विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या अन्नाचे फोटो पाहूनच खेळत येईल अशी स्थिती आहे, त्यामुळे अन्न खाल्ल्यामुळे काय झाले असावे याची कल्पनाच केलेली बरी. दरम्यान हे प्रकरण माध्यमांसमोर येऊ नये यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रकार बाहेर कोणाला सांगितलं तर खबरदार ..अशी धमकीचा वस्तीगृहाच्या प्रशासनातील एका दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले तर प्रकरणाचा भांडाफोड होऊ शकतो म्हणूनच मुलींना खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत, सर्व मुलींचे वय हे १७ वर्षापेक्षा अधिक आहे.
विश्वाचा झालेल्या सर्वच मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून शेतकऱ्यांच्या आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्या चिखलीतील शासकीय वस्तीगृहात राहतात.”दादा आम्ही गरीब आहोत,२ हजार रुपये आम्ही मेसेज देऊ शकत नाही.. पण आम्हाला शिकायचे आहे..”असे सांगताना एका मुलीच्या डोळ्यात अश्रू आले होते…



