Uncategorized

पातुर्डा खुर्द येथील तलाठी जाधव एसीबीच्या जाळ्यात शेगाव पो. स्टेशन येथे गुन्हा दाखल.

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे ).

संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे कार्यरत असलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटकल्याची मिळाली आहे एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे पंजाबराव भगवान जाधव वय 49 अशें या खदाड तलाठ्याचे नाव आहे मिळालेल्या माहिती नुसार तक्रारदार यांनी फौजी अस्वंद येथील शेत जमीन त्याच्या आत्या भावाच्या नावे खरेदी केली असून सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांच्या आते भावांचे नाव घेण्यासाठी व खरेदी करण्यासाठी मोबदला म्हणून तलाठी जाधव यांनी तक्रारदारास10 हजार रुपये लाचेची मागणी केले असता दि.13 मार्च रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता तलाठी जाधव यांनी 8 हजार रुपये लाच रक्कम तात्काळ घेऊन येण्यास सांगितले परंतु तलाठी जाधव यांना तक्रारदाराव संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही त्यावरून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लाच मागणी बाबत शेगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 2024 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम1988 प्रमाणे 21 मे. रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहेपर्यंत सुरू होती. सदर कारवाई श्रीमती शितल घोंगरे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी तसेच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे सापळा मदत पथक सफौ श्याम भांगे पोहेकाॅ प्रवीण बैरागी. पोना. जगदीश पवार. पुना. विनोद लोखंडे. पोकाॅ. रणजीत व्यवहारे. चानापोकाॅ. नितीन शेटे. चालक पोकाॅ. अर्शद शेख यांनी पार पाडली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button