खानदेश

वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.सिद्धार्थ देवळे यांच्या नावाची घोषणा.

शिवसेना उबाठा पक्षाकडून नाव घोषित

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – वाशिम आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे.गेल्या अनेक दिवसापासून वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?असा प्रश्न निर्माण झाला होता.किंवा वाशीम मंगरूळपीर विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटते याची देखील चर्चा होताना दिसत होती.मात्र अखेर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असल्यामुळे या मतदारसंघातून वाशिम शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा समाजसेवी व्यक्तीमत्त्व डॉ.सिद्धार्थ देवळे यांनी नुकताच मुंबई येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून हातात मशाल घेतली होती.अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर रोजी 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये डॉ.सिद्धार्थ देवळे यांचे देखील नाव घोषित केले आहे. डॉ. सिद्धार्थ देवळे यांची महाविकास आघाडी कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यात व जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button