बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

लोक अभिरक्षक कार्यालयाचे कामकाज सुरु अकोला पुर्णाजी खोडके अकोला दि.१६ येथील

*लोक अभिरक्षक कार्यालयाचे कामकाज सुरु अकोला पुर्णाजी खोडके अकोला दि.१६ येथील …*

स्टार भारत लाईव्ह एक्षप्रेस्स अकोला प्रतिनिधी : दत्ता सुलताने अकोला दि.१६ येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणअंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत गरजू व्यक्तिंसाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. केवले यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात आले. या कार्यालयात मुख्य अभिरक्षक एन.एन. उंबरकर, उपमुख्य लोक अभिरक्षक डी.डी. गवई, सहायक लोक अभिरक्षक व्ही.एम. किर्तक, श्रीमती बी.डी. राऊत, एम.पी.सदार, ए.ए.हेडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयात अकोला जिल्हा न्यायालयात सरकार तर्फे दाखल सर्व प्रकरणांमध्ये गरजू व्यक्ती , आरोपींसाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. या सेवेचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button