नवतरुणांचा उत्साह पक्षाला ताकद, बळ देईल- रोहिणी खडसे

वढवे येथिल तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथिल तरुणांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
यावेळी रोहिणी खडसे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले
यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालणारा पक्ष असुन
सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व महिला, नवतरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द असणाऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही सर्व तरुणांनी प्रवेश केला तुमचे स्वागत आणि आभार ,तुम्हा सर्व नवतरुणांचा उत्साह, आणि ताकद पक्षाला निश्चितच बळ देईल
आगामी काळात सर्व मिळून एकजुटीने कार्य करू पक्षाचे ध्येय धोरणे,कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त करून पक्षात सर्वांना सन्मान दिला जाईल
कोणत्याही सुख दुःखातपक्षाचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असुन
गावाच्या विकासासाठी तुम्ही तरुण आमच्या सोबत आला आहेत आगामी काळात गावाच्या विकासासाठी निश्चित पाठपुरावा करू व विकासकामे मार्गी लावू असे प्रवेश घेणाऱ्या तरुणांना रोहिणी खडसे यांनी आश्वस्त केले
प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशाल सुरवाडे, प्रविण धुंदले, रतन बोदडे, सुभाष सुरवाडे, समाधान सावळे, आनंदा धुंदले, विकास मोरे, रमेश सावळे, राहुल सावळे, दिपक सुरवाडे, निलेश बोदडे, राजेश सावळे, सागर तायडे, गौरव तायडे, अजय बोदडे, गौतम सावळे, प्रमोद बोदडे, पंडित सावळे, श्रीकृष्ण धुंदे, भारत तायडे, युवराज तायडे, रोहित तायडे, दिनेश बोदडे, रामदास धुंदे, अविनाश धुंदे, हर्षल सावळे व इतर युवकांचा समावेश आहे
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र (सोनू)पाटिल, बापू ससाणे,निलेशब भालेराव,निलेश पाटिल,प्रदिप साळुंखे, सुनिल पाटिल,संजय कोळी,रऊफ खान, रफिक मिस्त्री,राहु पाटिल,चेतन राजपुत,बाळा चिंचोले,विजय शिरोळे, निवृत्ती कोळी,मुश्ताक मण्यार,फिरोज सय्यद,दर्शन ठाकूर ,जितेंद्र पाटिल, अजय अढायके आणि पदाधिकारी उपस्थित होते



