क्राईमखानदेशजळगावा जिल्हानिवडणूक

प्रचार रॅलीत अपक्ष उमेदवार यांच्यावरती गोडी बार

बोदवड । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला जोर आला आहे. मात्र याचा दरम्यान बोदवड तालुक्यात अपक्ष उमेदवारावर प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघामधून विनोद सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांनी आज शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे.

त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button