भोई समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सोबतच जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

मुक्ताईनगर
दि . 16 महाराष्ट्रातील भोई समाज व तत्सम पोट जाती समुदायाच्या आरक्षणाच्या विविध बाबी तसेच माजी खासदार स्वर्गीय जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे यासह विविध मागण्याबाबत जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळातर्फे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,तहसीलदार तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. सदर निवेदन तहसीलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठवण्यात आले आहे.शिष्टमंडळाचे नेतृत्व जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष एस ए भोईसर, मुक्ताईनगर तालुका भोई समाजाचे अध्यक्ष छोटू भोई, काँग्रेस च्या भटक्या जाती जमाती व विमुक्त जमाती सेलचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, भोई समाज प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तत्काळ बैठक घेऊन समाजाचा प्रश्न मार्गी लावणे संदर्भात आश्वासन दिले. तसेच मुक्ताईनगर येथे भोई समाज भवन बांधण्यासाठी निधी देण्याचे देखील आश्वासन दिले.निवेदनात म्हटले आहे की,भोई व तत्सम पोट जाती समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोटीच्या वर आहे. भोई समाज हा नदी, तलाव, धरणे यांच्या काठावर राहणारा व डांगरवाडी,चणे- फुटाणे व मासेमारी तसेच मासे विक्री करून उपजीविका करणारा मागासवर्गीय समाज आहे. समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छीमारी आहे, मच्छीमारी सहकारी संस्थांच्या सभासदांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावे भोई समाज हा राज्य सरकारमध्ये एनटी ब म्हणजेच भटक्या जमातींच्या यादीत आहे. भोई समाजाच्या एकूण 39 पोट जाती महाराष्ट्रात असून सर्व एनटी ब मध्येच मोडतात तसेच केंद्र सरकारच्या यादीत इतर मागासवर्गीय म्हणून नोंद आहे. प्रामुख्याने समाज हा ग्रामीण भागात राहत असून अगदी हालाखीचे जीवन व्यतीत करत आहे.सामाजिक भोई समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सोबतच जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी




