सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे लेवा गणबोली दिवस’ साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव
सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लेवा गणबोली दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याला उजाळा दिला. तसेच लेवागण बोलीचे महत्व सांगितले. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी मानव आपल्या बोलीभाषेचा नियमित वापर करीत असतो हे समजावून सांगितले.
यावेळी डॉ. पाटील यांनी बहीणाबाई चौधरी यांच्या कविता संग्रहाचे वाचन केले. विद्यार्थीनी शिक्षिका चंद्रलेखा पवार आणि तेजस्विनी पाटील यांनी बहीणाबाई चौधरी यांच्या विषयी माहिती देताना बोली भाषेचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा सुवर्णा अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा निधी शर्मा यांनी केले कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.



