मुक्ताईनगर

प्रजाशक्ती क्रांती दलाने, उपोषणस्थळी केला गुढीपाडवा साजरा, नोंदवला सरकारचा निषेध

मुक्ताईनगर प्रतिनिधी

प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी ता. मुक्ताईनगर येथे प्रादेशिक परिवहण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी उपोषणास बसले आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस शासन स्तरावरून उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे काल प्रादेशिक परिवहण विभागाच्या अधीकार्यांना पत्र देऊन व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, मंत्री गिरीश महाजन यांना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून उपोषण स्थळी संविधानिक पद्धतीने पाडवा साजरा करण्यासाठी सकाळी 11.30 वाजता आमंत्रित केले होते परंतु साधारण 12 वाजायला आलेत तरी कुठलेच मंत्री, अधिकारी उपोषणस्थळी आले नाहीत शेवटी उपोषण कर्त्यांनीच उपोषणस्थळी सं विधानिक पद्धतीने पाडवा साजरा केला व सरकार चा निषेध नोंदवला ह्या वेळी प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे, राज्य अध्यक्ष पंकज सपकाळे, राज्य सचिव adv सतीश मोरे जळगाव जिल्हा संघटक अमित तडवी, युवा जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे उपस्थित होते सरकार ने लवकरात लवकर भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी विनंती अशोराज तायडे यांनी सरकारला केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button