जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय
मुक्ताईनगर मधील शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत भाऊ पाटील आज रोजी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि महाराष्ट्र मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज

मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर मध्ये काल अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाने फॉर्म भरले होते. मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील हे आज शक्ती प्रदर्शन करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत . त्यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व महाराष्ट्र चे मंत्री संकट मोचक गिरीश महाजन यांचा देखील समावेश होणार आहे असे माहिती पडले आहे. जोरदार शक्ती प्रदर्शनाने चंद्रकांत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच त्यांचे मुक्ताईनगर मध्ये जाहीर सभा देखील ठेवण्यात आलेली आहे. मुक्ताईनगर मध्ये चौरंगी लढत होणार असून प्रत्येक उमेदवाराच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. जनतेच्या माध्यमातून सर्वात जास्त कौल कोणाला मिळणार हे आपल्याला इलेक्शन संपेपर्यंत समजणारच आहे.
.



