टू व्हीलर, थ्री व्हिलर, फोर व्हीलर विना लायसन तसेच विना नंबर प्लेट वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव- सर्वच वाहनावर नजर ठेवत पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या निरीक्षणात सर्वच ट्रॅफिक पोलीस कर्मचारी कामाला लागलेली आहेत. शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर सर्वात शेगाव मध्ये अलर्ट मोड जाहीर करून पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी धडक कारवाईला सुरुवात केली.आज चार-पाच दिवस उलटून गेले सुद्धा सर्वोच्च शहरांमध्ये विना नंबर भेट गाड्या मोठ्याने आवाज करणाऱ्या गाड्या ट्रिपल सीट मोटरसायकलवर वाहतूक करणाऱ्या मोटरसायकल तसेच इतर गाड्या यांच्यावर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. मोठ्या लक्झरी गाड्यांची फिटनेस चेकिंग देखील करण्यात येत आहे तसेच छोट्या मोठ्या गाड्यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर व चालकाचे लायसन्स वगैरे पीयूसी इतर कागदपत्रे व्यवस्थित असल्याने त्यांना वेळी त वाहन चालवण्याचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. ट्राफिक प्रभारी अधिकारी वानखडे यांच्या निरीक्षणात खामगाव रोड, बाळापुर रोड,आकोट रोड, शेगाव रोड सर्वत्र शहराच्या येण्याअगोदर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चौक बंदोबस्त पोलिसांमार्फत अलर्ट मोड जाहीर करून दांडणात्मक करवाई करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून विविध विनापरवाना तसेच अनियमित नियम मोडत वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. त्याने तालुक्यात सगळीकडे अनियमित वाहन चालकांचे धाबे दणाणलेले आहे.या धडाडीच्या कारवाई नंतर सर्वत्र ठीकांनाहून पोलिसांचे कौतुक देखील होत आहे…



