खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
नांदुरा नगरपालिका अंतर्गत नांदुरा खुर्द येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा नगरपालिका अंतर्गत नांदुरा खुर्द येथील प्रभाग क्र.१० मध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी भवानी मंदिर, बालाजी मंदिर व गुरुदेव सेवाश्रम येथे नगरोत्थान योजने अंतर्गत मंजूर सभामंडप बांधकाम करणे. अशा विविध विकास कामांचे आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते व भाजपा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्येक्ष संवाद साधून, “महाविजय_2024” साठी प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले.



